अवचित यावे असे कुणीतरी,
आणि सरावी एकल वाट,
संगे संगे चालत असता,
हळूच घ्यावा हाती हात...
त्या स्पर्शाने पुलकित व्हावे,
आणि सुचावी अनवट तान,
गर्भरेशमी सरगम लेउन,
कंठी यावे नाजूक गान...
त्या गाण्याने झंकृत व्हावी,
मनवीणेची अबोल तार,
आणि चढावा सर्वान्गावर,
सुवर्णपंखी अनुपम साज...
- श्रीपाद कोठे
नागपूर
आणि सरावी एकल वाट,
संगे संगे चालत असता,
हळूच घ्यावा हाती हात...
त्या स्पर्शाने पुलकित व्हावे,
आणि सुचावी अनवट तान,
गर्भरेशमी सरगम लेउन,
कंठी यावे नाजूक गान...
त्या गाण्याने झंकृत व्हावी,
मनवीणेची अबोल तार,
आणि चढावा सर्वान्गावर,
सुवर्णपंखी अनुपम साज...
- श्रीपाद कोठे
नागपूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा