मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१३

कवीचं रीतेपण भरायचं आहे

कोकीळेला आण आहे
नदीला जाण आहे
वार्याला भान आहे
कवीचं रीतेपण भरायचं आहे...

फुलांना याद आहे
हिमालयाची साद आहे
मित्रांची दाद आहे
कवीचं रीतेपण भरायचं आहे...

आयुष्य अफाट आहे
गाडी सुसाट आहे
अनोळखी वाट आहे
कवीचं रीतेपण भरायचं आहे...

- श्रीपाद कोठे
नागपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा