सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१३

माझ्यावर प्रेम करतोस?

... माझ्यावर प्रेम करतोस, खूप?
... शंका आहे तुझ्या मनात?
... माझी आठवण येते? बेचैन करणारी?
... नाही
... फुललेला मोगरा पाहिला की?
... नाही
... आकाशीचा चंद्र पाहिला की?
... नाही
... चंद्राशेजारची रोहिणी पाहिली की?
... नाही
... अमावास्येचं टिपुर चांदणं पाहिलं की?
... नाही
... कविता वाचताना?
... नाही
... कविता लिहिताना?
... नाही
... समुद्राच्या लाटा पाहिल्या की?
... नाही
... मोराच नृत्य पाहिलं की?
... नाही
... पाणीपुरी, कुल्फी खाताना?
... नाही
... हळवा झालास की?
... नाही
... राग आला की?
... नाही
... आणि तरीही?
... हो. खूप, अगदी मनाच्या तळापासून
... ???
... अगं वेडाबाई, तुला आठवण्यासाठी तुला विसरायला तर हवं ना?

- श्रीपाद कोठे
नागपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा