मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१३

डायरी...

डायरी...
तुमची, माझी
याची, त्याची
अक्षरे वेगळी, कदाचित...
भावना?
एक पान- आनंदी
एक पान- दु:खी
एक पान- हसरं
एक पान- उदास
एक पान- चिडकं
एक पान- रडकं
एक पान- जिवंत
एक पान- जीर्ण
एक पान- हवसं
एक पान- नकोसं
काही पाने- कोरी
अशीच, इतस्तत:...

- श्रीपाद कोठे
नागपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा