सखे,
सुटून जातो
मी धरलेला माझाच हात
कधी सुखाच्या उंच उंचलाटांवर
स्वार होताना
कधी दु:खाच्या खोल दरीत
भिरकावला जाताना
कधी फुलांच्या पायघड्यांवरचालताना
कधी जळते निखारे तुडवताना,
कधी वाटते मीच आहे
सारा आनंद, उत्साह, सुखवगैरे
कधी वाटते मीच आहे
सारी व्यथा, वेदना, दु:खवगैरे,
कधी सुखाच्या भोवर्यात
कधी दु:खाच्या वावटळीत
सुटून जातो हात
मीच माझा धरलेला
जत्रेत हरवलेल्या मुलासारखा
भिरभिरू लागतो
फरफटू लागतो
डगमगू लागतो
कधी वर, कधी खाली,
अन अकस्मात तू येतेस
देतेस माझा हात
दयाळूपणे; माझ्याच हाती
अलवारपणे
आणि निघून जाते
हसत हसत
होतेस लुप्त
पुन्हा एकदा
मी गटांगळ्या खाईपर्यंत
निर्दयीपणे
सखे गं...
- श्रीपाद कोठे
- नागपूर
- मंगळवार, १५ ऑक्टोबर २०१३
सुटून जातो
मी धरलेला माझाच हात
कधी सुखाच्या उंच उंचलाटांवर
स्वार होताना
कधी दु:खाच्या खोल दरीत
भिरकावला जाताना
कधी फुलांच्या पायघड्यांवरचालताना
कधी जळते निखारे तुडवताना,
कधी वाटते मीच आहे
सारा आनंद, उत्साह, सुखवगैरे
कधी वाटते मीच आहे
सारी व्यथा, वेदना, दु:खवगैरे,
कधी सुखाच्या भोवर्यात
कधी दु:खाच्या वावटळीत
सुटून जातो हात
मीच माझा धरलेला
जत्रेत हरवलेल्या मुलासारखा
भिरभिरू लागतो
फरफटू लागतो
डगमगू लागतो
कधी वर, कधी खाली,
अन अकस्मात तू येतेस
देतेस माझा हात
दयाळूपणे; माझ्याच हाती
अलवारपणे
आणि निघून जाते
हसत हसत
होतेस लुप्त
पुन्हा एकदा
मी गटांगळ्या खाईपर्यंत
निर्दयीपणे
सखे गं...
- श्रीपाद कोठे
- नागपूर
- मंगळवार, १५ ऑक्टोबर २०१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा