आदि अंताचा हिशेब करीत
चिंचेच्या झाडाखाली बसलेला,
दोहोंच्या मधील
गुणाकाराची उत्तरे
बेरजांच्या रकमा
वजाबाकीची आकडेमोड
भागाकाराची शिल्लक-
सगळीच उत्तरे अनाकलनीय
व्हायरस शिरलाय जणू
मनाच्या हार्ड डिस्कमध्ये,
तत्वज्ञानाने
गणिते सोडवण्याचा प्रयत्न
गणिती पद्धतीने
तत्वज्ञानाची उकल करण्याचा खटाटोप
निमिषार्धापासून
परार्धापर्यंत
मेंदूचा भुगा करण्याचा उद्योग
अखेर हतबल
मान वर आभाळाकडे
नजर झाडावर लटकलेल्या चिंचांकडे
आता मोडेल अशी जाणीव झाल्यावर
मान खाली, नजर
चिंचेच्या तळाशी धावणाऱ्या मुंगळ्यांवर
मग थोड्या वेळाने समोर,
नदीपल्याडची जळणारी चिता
आदळते नजरेवर
आणि अचानक सुटतात
सारे गुणाकार, भागाकार
बेरजा नि वजाबाक्या
आणि नजरेपुढे
लख्ख उभं राहतं उत्तर
.............. `मी'
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, २४ सप्टेंबर २०१३
चिंचेच्या झाडाखाली बसलेला,
दोहोंच्या मधील
गुणाकाराची उत्तरे
बेरजांच्या रकमा
वजाबाकीची आकडेमोड
भागाकाराची शिल्लक-
सगळीच उत्तरे अनाकलनीय
व्हायरस शिरलाय जणू
मनाच्या हार्ड डिस्कमध्ये,
तत्वज्ञानाने
गणिते सोडवण्याचा प्रयत्न
गणिती पद्धतीने
तत्वज्ञानाची उकल करण्याचा खटाटोप
निमिषार्धापासून
परार्धापर्यंत
मेंदूचा भुगा करण्याचा उद्योग
अखेर हतबल
मान वर आभाळाकडे
नजर झाडावर लटकलेल्या चिंचांकडे
आता मोडेल अशी जाणीव झाल्यावर
मान खाली, नजर
चिंचेच्या तळाशी धावणाऱ्या मुंगळ्यांवर
मग थोड्या वेळाने समोर,
नदीपल्याडची जळणारी चिता
आदळते नजरेवर
आणि अचानक सुटतात
सारे गुणाकार, भागाकार
बेरजा नि वजाबाक्या
आणि नजरेपुढे
लख्ख उभं राहतं उत्तर
.............. `मी'
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, २४ सप्टेंबर २०१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा