एक थरथरती
सुरकुतलेली ओंजळ
अचानक सामोरी
आणि कानी हळुवार
सुगंधी शब्दमोती
`ही बकुळीची फुलं'...
अज्ञातातून अलगद आलेले
तोडीचे अलवार स्वर
श्रुतींना तृप्त करीत म्हणाले,
`आम्हाला ओळखलंत?'...
शेजारून वाहणार्या
मंदाकिनीच्या शतसहस्र लाटा
शिवाशिवी खेळत होत्या
आठ वर्षांच्या अल्लड बालिकेसारख्या...
मंद मंद सुखाचे
गंधित हिंदोळे
मनाला गुदगुल्या करीत होते...
आणि मी?
मी भोगत होतो
अरुपाने माझ्या झोळीत टाकलेले
रूपमय दान... अतृप्तपणे....
- श्रीपाद कोठे
नागपूर
सुरकुतलेली ओंजळ
अचानक सामोरी
आणि कानी हळुवार
सुगंधी शब्दमोती
`ही बकुळीची फुलं'...
अज्ञातातून अलगद आलेले
तोडीचे अलवार स्वर
श्रुतींना तृप्त करीत म्हणाले,
`आम्हाला ओळखलंत?'...
शेजारून वाहणार्या
मंदाकिनीच्या शतसहस्र लाटा
शिवाशिवी खेळत होत्या
आठ वर्षांच्या अल्लड बालिकेसारख्या...
मंद मंद सुखाचे
गंधित हिंदोळे
मनाला गुदगुल्या करीत होते...
आणि मी?
मी भोगत होतो
अरुपाने माझ्या झोळीत टाकलेले
रूपमय दान... अतृप्तपणे....
- श्रीपाद कोठे
नागपूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा