आठवणींचा, गोतावळ्याचा
आपल्या लोकांचा
परक्या लोकांचा
ओळखीच्यांचा अन
अनोळखी लोकांचाही
सुखदु:खाचीही
मोजावी लागत होती किंमत
झेलावे लागत होते
वार आणि प्रहार
ना अपवाद सणवाराचा
ना सोयर सुतकाचा
वेगवेगळ्या रंगातील
विविध पोषाखांचे
तेच तडाखे;
ठरवलं एक दिवस
करायचा याचा शेवट
लावून टाकायचा
निकाल एकदाचा;
धरलं मानगूट स्वत:चं
म्हटलं-
बास झाले तुझे लाड
सरळ पुरलं थडग्यात
स्वत:लाच
अन झालो `मी'विहीन;
आता नाही कुठलाच त्रास
आता फक्त हसतो
वाकुल्या दाखवत सगळ्यांना
आठवणींना, गोतावळ्याला
याला अन त्यालाही...
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, १९ ऑगस्ट २०१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा