पांथस्थ नदीवर बसलेले
डोळ्यात घेउनी काय?
वटवृक्ष तीरावर हळवा
मौनास घालितो साद
पडसाद नदीवर उठले
वाहते पाणी हलले
शतकांची सळसळ भेदून
अस्फुट काही वदले
जगी असाच वाहत असतो
पाण्याचा शांत प्रवाह
उदरात वागवीत फिरतो
काजळभरला डोह
नियतीची किमया अद्भुत
डोहाचा थांग कुणाला?
काळाच्या मगरमिठीतून
कोणीच नाही सुटला
कुणी घेऊन येतो प्राक्तन
आयुष्य वाहते होते
कोणाच्या नशिबी फरपट
आयुष्य थांबुनी जाते
नदीवरुनी जो पक्षी उडतो
नावच नसते त्याचे
जे प्रेत वाहते पात्रामधुनी
तेही निनावी असते
निरर्थकाचा अर्थ कासया
लावीत बसतो तू रे
व्यर्थ शिणविसी तना-मनाला
अंति काहीच नुरते
- श्रीपाद कोठे, नागपूर
मंगळवार, २९ मे २०१२
डोळ्यात घेउनी काय?
वटवृक्ष तीरावर हळवा
मौनास घालितो साद
पडसाद नदीवर उठले
वाहते पाणी हलले
शतकांची सळसळ भेदून
अस्फुट काही वदले
जगी असाच वाहत असतो
पाण्याचा शांत प्रवाह
उदरात वागवीत फिरतो
काजळभरला डोह
नियतीची किमया अद्भुत
डोहाचा थांग कुणाला?
काळाच्या मगरमिठीतून
कोणीच नाही सुटला
कुणी घेऊन येतो प्राक्तन
आयुष्य वाहते होते
कोणाच्या नशिबी फरपट
आयुष्य थांबुनी जाते
नदीवरुनी जो पक्षी उडतो
नावच नसते त्याचे
जे प्रेत वाहते पात्रामधुनी
तेही निनावी असते
निरर्थकाचा अर्थ कासया
लावीत बसतो तू रे
व्यर्थ शिणविसी तना-मनाला
अंति काहीच नुरते
- श्रीपाद कोठे, नागपूर
मंगळवार, २९ मे २०१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा