रूपवेडया या मनाला
खंत ही बिलगून राहे
कालचे ते फूल वेडे
आज का निर्माल्य होते?
...
रूपवेडया या मनाला
खंत ही बिलगून राहे
चंद्र तारे चांदण्यांचे
तेज का निस्तेज व्हावे?
...
रूपवेडया या मनाला
खंत ही बिलगून राहे
भाववेडे स्वप्न फुलले
आज का भंगून जाते?
...
रूपवेडया या मनाला
खंत ही बिलगून राहे
काल जे होते हवेसे
आज का ते दूर जावे?
...
रूपवेडया या मनाला
खंत ही बिलगून राहे
कालची ममता नि माया
आज कोठे लोप पावे?
...
रूपवेडया या मनाला
खंत ही बिलगून राहे
कालच्या त्या रंगरेषा
आज का हरविले सारे?
...
- श्रीपाद कोठे
नागपूर
खंत ही बिलगून राहे
कालचे ते फूल वेडे
आज का निर्माल्य होते?
...
रूपवेडया या मनाला
खंत ही बिलगून राहे
चंद्र तारे चांदण्यांचे
तेज का निस्तेज व्हावे?
...
रूपवेडया या मनाला
खंत ही बिलगून राहे
भाववेडे स्वप्न फुलले
आज का भंगून जाते?
...
रूपवेडया या मनाला
खंत ही बिलगून राहे
काल जे होते हवेसे
आज का ते दूर जावे?
...
रूपवेडया या मनाला
खंत ही बिलगून राहे
कालची ममता नि माया
आज कोठे लोप पावे?
...
रूपवेडया या मनाला
खंत ही बिलगून राहे
कालच्या त्या रंगरेषा
आज का हरविले सारे?
...
- श्रीपाद कोठे
नागपूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा