...............
लोक म्हणाले वेडा आहे...
कुणीस बोललं-
खरा शहाणा हाच...
माझं मौन...
दुर्दैवी बापडा,
दु:ख असेल काहीतरी,
अहो पक्का बनेल,
महाधूर्त, आतल्या गाठीचा,
साधा बिचारा,
काही प्रतिक्रिया...
माझं मौन...
नाव काय, गाव काय?
काम काय, धाम काय?
प्रश्नावर प्रश्न
प्रश्नांना उपप्रश्न...
माझं मौन...
कसं काय मौनीबाबा?
प्रथम थट्टामस्करी, मग पांगापांग...
माझं मौन...
मौन एके मौन, मौन दुने मौन
मौन अगणित मौन,
गाभुळल्या मनाचं
अथांग मौन...
- श्रीपाद कोठे
नागपूर
लोक म्हणाले वेडा आहे...
कुणीस बोललं-
खरा शहाणा हाच...
माझं मौन...
दुर्दैवी बापडा,
दु:ख असेल काहीतरी,
अहो पक्का बनेल,
महाधूर्त, आतल्या गाठीचा,
साधा बिचारा,
काही प्रतिक्रिया...
माझं मौन...
नाव काय, गाव काय?
काम काय, धाम काय?
प्रश्नावर प्रश्न
प्रश्नांना उपप्रश्न...
माझं मौन...
कसं काय मौनीबाबा?
प्रथम थट्टामस्करी, मग पांगापांग...
माझं मौन...
मौन एके मौन, मौन दुने मौन
मौन अगणित मौन,
गाभुळल्या मनाचं
अथांग मौन...
- श्रीपाद कोठे
नागपूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा