मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१३

रुईचं झाड़

रुईचं झाड़ कुठेही उगवतं
पण
त्याचं बी कोणी पेरीत नाही,
ते झाडावरुन उडतं, वार्यासंगे
आणि कुठेतरी मातीत जाऊन पडतं
मातीनं प्रेम दिलं तर रुजतं
त्याचं मग झाड होतं...
सत्यही असंच रुजतं म्हणतात,
मी पाहिलेलं नाही...
मैत्री आणि प्रेमाची बिजं मात्र
अशीच उडतात, जाऊन पडतात
आणि रूजतात, वाढतात...
त्यांना लागत नाही निमंत्रण
त्यांना लागत नाही प्रयोजन...
क्षणांच्या कणीकांनाच
अनंत अस्तित्वाचे संदर्भ देत
ती जगत राहतात, अपराजीतपणे...

- श्रीपाद कोठे
नागपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा