सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१३

धुकं

उजेडासारखं असूनही
अंधारासारखं नसूनही
पल्याडचं काहीच
दिसत नाही...
हातास ते लागत नाही,
मुठीत धरता येत नाही,
कळूनही वळत नाही,
वळूनही कळत नाही...
कधी असतं दाट दाट
कधी असतं विरळ विरळ...
अपघाताचं भय नित्य
धुकं असतं एक सत्य...
जीवन असंच, एक धुकं...
कधी दाट, कधी विरळ
घालीत बसतं, सदा भुरळ...

- श्रीपाद कोठे
नागपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा