दिव्यात ज्योत नाचते
घेउनी तुला ऊरी
तिथेच तुळस डोलते
लेऊनी तुझी छबी ...
सुहास्य सांज दरवळे
उडून जाती पाखरे
अशब्द पवन वाहतो
मनास लागते पिसे ...
उचंबळून भावना
शब्दरूप पावती
जळात हालुनी जशा
सावल्याही बोलती ...
दाटली तशीच तुही
आत आणि बाहरी
सावरू कसे मलाच
सैरभैर वैखरी ...
-श्रीपाद कोठे, नागपूर
घेउनी तुला ऊरी
तिथेच तुळस डोलते
लेऊनी तुझी छबी ...
सुहास्य सांज दरवळे
उडून जाती पाखरे
अशब्द पवन वाहतो
मनास लागते पिसे ...
उचंबळून भावना
शब्दरूप पावती
जळात हालुनी जशा
सावल्याही बोलती ...
दाटली तशीच तुही
आत आणि बाहरी
सावरू कसे मलाच
सैरभैर वैखरी ...
-श्रीपाद कोठे, नागपूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा