सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१३

मुखवटे

मोठी जत्रा भरली होती
सगळेच लोक आले होते
देवाजीच्या दर्शनाला
सगळेच रांगेत लागले होते...
सगळ्यांनाच वेळ खूप होता
पानसुपार्या निघत होत्या,
आणि गप्पा सगळ्यांच्या
पिढ्या पिढ्यांच्या सुरु होत्या...
जन्मोंजन्मीच्या ओळखीची
आश्वासने मिळत होती
आग्रहाने सगळ्यांना
बोलावणी सुरु होती...
देवाजीचे दर्शन झाले
प्रसाद सुद्धा घेऊन झाला
मुखवटे सगळे गळून पडले
सरसर सारे सरकू लागले...

- श्रीपाद कोठे
नागपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा