मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१३

एकट्याचा मार्ग माझा

एकट्याचा मार्ग माझा
अन् एकट्याचे चालणे
एकट्याचे हे जिणे
अन् एकट्याचे संपणे...

सोबतीला मित्र काही
बंधू सारे आप्तही
वाटते पण सर्व काही
तोकडे अन् बेगडी...

स्मृतींची ही एकतारी
अंतरी नित छेडते
एकट्याचे गीत माझे
मानसी झंकारते...

- श्रीपाद कोठे
नागपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा