रविवार, २८ एप्रिल, २०१३

अंधारातून एक कावळा ओरडतो

अंधारातून एक कावळा ओरडतो
मनात निजला छोटा पक्षी बावरतो

पाणवठ्याला रान सोडूनी कुणी येतो
शांत जळीचा स्वस्थ किनारा घाबरतो

आकाशातील तारा तुटुनी कोसळतो
कुंद मनातून धुंद मारवा घुमतो

पारावरती सुकली पाने गळतात
धूप होऊनी मुकीच स्वप्ने विरतात

रस्त्यावरचा अनाथ कुत्रा ओरडतो
मनी जागला छोटा पक्षी का रडतो?

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, २८ एप्रिल २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा