शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३

पण

येथेच टाकली होती
मूठभर राख,
त्याची
अखेरची इच्छा म्हणून,
बरोब्बर वर्षभरापूर्वी
येथेच झाला होता
दृष्टीआड कायमचा,
आज उगवली आहेत
हसरी फुले
त्याच राखेतून,
पण त्यांना कुठे माहिताय
फूल कोमेजतंच असतं,
वर्षभरापूर्वी
कोमेजलं होतं तसं...

-श्रीपाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा