शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३

असून नसणे

मार्गावर तुझी
सोबत सतत
तरी नाही होत
भेट कधी

काय तुझे गुज
आकळेना मज
मात्र तुझी गाज
सोबतीस

वाट वळणांची
थकविते फार
चकविते मज
वारंवार

तुझ्या पावलात
मोगरा, बकुळ
फुलतो प्राजक्त
क्षणोक्षणी

अत्तराचा जैसा
दाटे परिमळ
असोनी सर्वत्र
दिसेचिना

तसेच तुझेही
असून नसणे
मज अंतर्बाह्य
वेढूनीया

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, ३१ जानेवारी २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा