जे जे सुखावणारे
ते ते निघून जाते
रस्ता असो कसाही
भ्रमणे उरून जाते
जे सोबतीस येते
त्याचा असा स्वभाव
ना हात हालविते
देता तया निरोप
दो चार पावलांचा
तो संग लाभताना
दाटे उरी उगाच
तो गंध मोगर्याचा
लाभे कधी कुणास
ती साथ शेवटाची
बोचे तरीही काटा
सुटतात जेवी गाठी
-श्रीपाद कोठे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा