सारेच मार्ग थांबतात
दिशाही विखरुन जातात
भाव-विभावाच्या अतीत
नि:सत्व अस्तित्वाची
केविलवाणी धडपड,
सिद्ध करण्यासाठी
एक निरर्थकत्व,
विरलेल्या लक्तरांचे
धागे जुळवत
उद्ध्वस्त आशेचे
पिवळे पडलेले
जुनेपुराणे चित्र
उलटत पालटत
पुन्हा पुन्हा,
दाटून येतो
घनगर्द अंधार
आणि शोधित बसतो
हरवलेला मनगंधार... ... ...
- श्रीपाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा