सगळे खेळतात म्हणून
मीही खेळायचे `बिग फूल'
टाळ्या पिटायच्या सगळ्यांसोबत
प्रत्येक डावाला
स्वत:च `बिग फूल' झालो तरीही;
पत्ते वाटणाऱ्याच्या हातून
मिळालेले राजे, राण्या हाती धरून
`पास' बोलत जायचे फक्त;
कोणीतरी भाग्यवान सुटणार
उरलेल्या सगळ्यांच्या पत्त्यांची
बेरीज होणार;
अन मी `बिग फूल',
न पाहता वाटलेल्या
पत्त्यांचा हा खेळ
अन हाती आलेले राजे, राण्या;
कुणीतरी वाटलेले आयुष्य
अन भाळी लिहिलेल्या
नशीबासारखाच
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, ९ मे २०१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा