शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३

नंदादीप

आशेची पणती
आशेचीच वात
आशा नाम तेल
त्यात जळे

आशेची ही ज्योत
आशेचा प्रकाश
आशेचा आनंद
चहू दिशी

निराशेचा वारा
घोंगावतो फार
त्याने आशाज्योत
थरथरे

बहु होती कष्ट
तिज आवरण्या
धावाधाव आता
कैसी करू

आता सरो खेळ
आशा निराशेचा
अखंड उजळो
नंदादीप

-श्रीपाद कोठे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा