स्वप्नातल्या परीला
सत्यात चाहतो मी
अस्तित्व ज्यास नाही
त्यालाच शोधतो मी
मी धावतो धराया
बागेतला सुवास
हातात फक्त उरती
निर्जीव ते पराग
कंठातल्या स्वरांना
शब्दात गुंतवोनी
नव्हता कधीच जो;
तो अर्थ शोधतो मी
मार्गावरील शोभा
पाहुनिया क्षणैक
जी संपते न कधीही
ती वाट चालतो मी
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २५ एप्रिल २०१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा