प्रेयसीच्या चंद्रवेळी
दाटुनी येते उरी
चांदव्याची स्निग्धताही
सोडुनी जाते दूरी
घेरते काळी उदासी
हालत्या पानांसवे
चिम्बलेले पाश सारे
जेवी होती पारखे
आठवांचे पक्षी येती
वादळांच्या संगती
परत जाती विस्कटोनी
आपुलीच घरटी
त्या व्यथेला पार नाही
नाही त्याची मोजणी
पीळ पडतो ज्यास ऐसा
तोच जाणे तल्लखी
प्रेयसीच्या चंद्रवेळी
नित्य ऐसी टोचणी
तरीही वळती पाय
जेथे, भेटली ती शेवटी
- श्रीपाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा