भेगाळून अवघा गेलो
लक्तरल्या देहातून
ज्वालांचे वादळ झालो
प्रत्येक फटीतून जेंव्हा
रक्ताळ वेदना हसली
विस्कटल्या माझ्यातून
त्वेषाची ठिणगी उठली
ठिणगीचा झाला वणवा
अवघ्याचा केला ग्रास
आंदोलित भूमिवरती
थरथरली वेडी राख
वार्याने उडता राख
तप्त धरा हळहळली
गहिवर आला मोठा
अवघी जाणीव विझली
आक्रोश असा भिरभिरला
अस्तित्व घेवुनी गेला
प्राणाच्या कल्लोळाला
शून्यात फेकुनी गेला
- श्रीपाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा