शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३

काहीबाही

केस मागे घेउन बांधलेले
थोड्या बटा चेहर्यावर
कमरेतून वाकलेली
डावा हात मागे कमरेवर
चेहर्यावरील भाव
समजण्यापलीकडले
उजव्या हाती झाडणी,
ती कचरा गोळा करून
बाहेर ढकलते आहे
अन्, वार्याने तो कचरा
पुन्हा पुन्हा परत येतो आहे,
नकोशा आठवणी
नकोशा घटना
नकोशा व्यक्ति
आणि न सरणार्या
दुर्दैवासारखाच,
... आता उमटू लागलं आहे
तिच्या चेहर्यावर
असंच काहीबाही

-श्रीपाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा