शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३

अस्पर्श

हरवून गेलो होतो
स्रुष्टिचं ते लोभसवाणं रूप पाहताना,
प्रदीर्घ तृषेनंतर झालेला
तो चैतन्याचा चिम्ब स्पर्ष
मोहवून गेला होता,
बाळसं धरलं होतं तिने
तो जादुभरा अलौकिक स्पर्ष
विझू विझू चाललेल्या
सार्याला पुन्हा चेतवून गेला होता

********************

एक कुंदाचं झाड मात्र
तसंच उभं होतं
बेरंग, निष्पर्ण, निस्तेज
सळसळ नाही,
हलणं नाही,
डुलणं नाही...
खडकालाही शेवाळ फोडणारी ती जादू
त्या कुंदावर मात्र चालली नव्हती,
त्याची मूळच हलली असावीत कदाचित
त्यांनाच धक्का लागला असेल जबर

**********************

मला उगीचच माझीच आठवण आली

-श्रीपाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा