शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३

वाकुल्या

नदीचे विशाल पात्र दिसते
गाडीतून जाताना
हरखलेले मन
लगेच उदास होते
त्या पात्रातील
काही ओहोळ पाहून,
अन चुकार मन
टिपून घेते-
विस्तीर्ण पात्रातील एक झोपडी,
खिडक्या दारांची गरज नसलेले
काही तट्टे आणि बांबू,
उन्हानेच निर्माण झालेल्या
झोपडीच्या सावलीत बसलेली
कुणी तरी महिला
आजूबाजूला एकदोन मुले;
चारदोन टरबूज- खरबूज
किंवा वाळूखालील
पाण्याचे चार घोट
यासाठीचाच हा संसार
चारदोन महिन्यांचा;
`पुढचे पुढे पाहू' म्हणत
गाडीकडे पाहून हात हलवणाऱ्या
त्या चारदोन आकृत्या
आणि त्यांना वाकुल्या दाखवणारी
लोकशाही आणि कल्याणकारी राज्य

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, २४ मार्च

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा