शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३

मी कैसा निर्दय क्रूर

मी घेतो ज्याला जवळी
त्यालाच लोटतो दूर
मी कैसा निर्दय क्रूर

क्षणी होतो सखासोयरा
क्षणी शत्रू शतजन्मांचा
हा माझा विचित्र खेळ

जो जीवन देतो मजला
मी सोडून देतो त्याला
मी असला कृतघ्न फार

आताचा माझा श्वास
होतो मग निश्वास
आहे केवळ आभास

हे माझे जीवनगाणे
तुमचे भावतराणे
कोणासी कळला पार?

- श्रीपाद कोठे
शुक्रवार
२२ फेब्रुवारी २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा