गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१३

आज हवे मज तुझे सुदर्शन



काय मागू मी आज तुला रे
तुझ्याजवळ तर सारे आहे
नको मला पण आज बासुरी
नकोच काला, नको चहाडी
गीतेमधला अर्थ राहू दे
रासक्रीडेची असो बढाई
लोणी, पावा, गोप-गोपिका
मधुर आवडे सारे काही
तरीही मजला आज नको ते
आज हवे मज फक्त सुदर्शन
आज हवे मज तुझे सुदर्शन

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २८ ऑगस्ट २०१३

रविवार, २७ ऑक्टोबर, २०१३

आठवणींच्या हिंदोळ्यावर

आठवणींच्या हिंदोळ्यावर
सुखदु:खाचे असंख्य झेले...
दु:ख बोचते, सुखही टोचते
विस्मरणाची गुहा उघडते...
डोळ्यामधली अश्रुसरिता
मुके किनारे ठेवून जाते...
मौन तीरांना साक्षी ठेवून
आभाळही मग निरभ्र होते...